Services

“धागे-दोरे” या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याशी जवळीकता साधतांना या गोष्टीचे नक्कीच भान राखले जाईल की, यातील प्रत्येक लेखाचा विषय हा आपल्याशी निगडित असाच राहील. आयुष्यात कुठल्या न कुठल्या वळणावर आपल्या समोर काही प्रसंग, घटना, विषय येतात. त्यानेच आपले आयुष्य समृद्ध होत असते. अश्या भल्या-बुऱ्या घटनांचा मागोवा, धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. लेख कुठेही कंटाळवाणा होणार नाही याची दक्षता घेत असतानाच कुणाचाही अवमान होईल अथवा असभ्य भाषेचा वापर होईल असे लिखाण कदापिही केले जाणार नाही याची मात्र हमी देतो. अजूनही खूप सुंदर आणि सकारात्मक जग आहे. आजूबाजूचा निसर्ग, परंपरा, संस्कार याचा वारसा आपल्याला लाभला आहे. तो आपण जतन करूया. आपण “धागे-दोरे” ब्लॉगला निश्चित लाईक, कमेंट द्वारे प्रोत्साहित कराल हीच अपेक्षा….!

Inspiration

मी चांगलं लिहितो असं सांगणारी माझी आई कै. श्रीमती मधुवंती मधुकर हिंगणे.

Strategy

नुसतंच रंजन करणारे नाही तर माहिती आणि व्यवस्थेमध्ये बदल घडवू पाहणारे लिखाण व्हावे हीच इच्छा.

Focus

समाजातील सर्वच स्तरातील सर्व वयोगटातील माणसांसाठी लिखाण.


Let’s build something together.