Background

नमस्कार,

लेखन कार्याच्या आवडीने अनुभव समृद्ध होता येतंय हे आता जवळपास तीस वर्षांच्या लेखन प्रवासातून अनुभवत आहे. मराठी वृत्तपत्र माध्यमातून पत्रकारिता करताना अनेक नव्या विषयांची ओळख झाली. काही जुनेच विषय नव्याने ओळखीचे झाले. समाजाचे बरेचसे प्रश्न समजले. त्यातील काही प्रश्न सोडवण्यासाठी लेखणी चालविली. आता माध्यमांचं स्वरूप बदलत आहे. माध्यमं आता डिजिटल झालीत. हे नवे तंत्र शिकतच नव्या पिढीशी संवाद साधायचा आहे. म्हणूनच ब्लॉग सुरू करण्याचं धाडस करतोय. आयुष्यात प्रगती साधताना गाठीशी येतात ते काही ‘कच्चे’ धागे तर काही ‘पक्के’ दोरे. कधी याचा गुंता होतो तर कधी ते एकमेकांत गुंफत एक तलम वस्त्र निर्माण करतात. अश्याच घटनांचा धांडोळा म्हणजेच ‘धागे-दोरे’. आपल्याला यातील लेख नक्कीच आवडतील….आपलेच वाटतील याची खात्री वाटते. त्यामुळे आपण नक्कीच लाईक आणि शेअर करा.