
मुकुंद मधुकर हिंगणे
मुक्त पत्रकार, नाट्य लेखक, स्तंभलेखन.
गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध मराठी वृत्तपत्रांमधून बातमीदार म्हणून काम पाहिले. पत्रकारितेमुळे सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडता आली. त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं जवळून अभ्यासता आले. त्यातूनच विविध विषयांवर लेखन घडले. पत्रकारिते बरोबरच हौशी मराठी रंगभूमीवर कार्यरत असून लेखक-दिग्दर्शक म्हणून पुरस्कार पटकाविले. एकांकिका, दोन अंकी नाटकांचे लेखन हे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत १२ नाटके आणि १० एकांकिका रंगमंचावर आल्या आहेत. या बरोबरच वृत्तपत्रांसाठी व्यावसायिक लेखन देखील करतो. कथा, कविता, स्फुट आदी प्रकारच्या लेखनातून अनुभव समृद्धीचा आनंद मिळवितो. आता डिजिटल माध्यमातून लेखनाकार्यासाठी “धागे-दोरे” या ब्लॉगद्वारे आपल्या समोर येतोय.
याशिवाय बरंच काही…..
- पटकथा लेखन
- नाट्य चळवळीत सहभाग
- ऐतिहासिक स्थळांना भेटी
- भ्रमंती आणि शोधन लेखन
