देव बंदी ही मंदिरी, कैसे जाऊ पंढरपुरी ।।

वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला आणि भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या वारकऱ्याला यंदाही आषाढी एकादशीला विठू माऊलीचे दर्शन घेता येणार नाही. कोरोना प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधांमुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले. गेल्या दोन वर्षांपासून विठूमाऊलीचे आषाढीला दर्शन घेता येत नाही की चंद्रभागेमध्ये डुबकी घेता येत नाही.

अवघ्या दोन दिवसांवर म्हणजेच २० जुलै रोजी आषाढी एकादशी आलीय. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या आषाढी एकादशीला कैवल्याचा राणा श्री पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते. तहान भूक विसरून अनवाणी पायाने काट्याकुट्याची वाट तुडवत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीसह पंढरपूरकडे निघालेले वारकरी कोरोना साथीचा प्रादुर्भाव आणि रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरच्या वाटेवर दिसेना. तर मंदिरात कुलूपबंद झालेली विठूमाऊली देखील दर्शन देईना. देव भेटीची ओढ लागलेल्या भक्तांना माऊली दर्शन केंव्हा देणार हीच आषाढी एकादशीची आर्त हाक आहे. शिवारात कोसळणाऱ्या पावसाच्या सरी मध्ये विठूमाऊली शोधावी की रानात उगवणाऱ्या पिकांच्या कोंबामध्ये माऊली पहावी….अठ्ठावीस युगांपासून नित्यदर्शन देणाऱ्या देवाने गेल्या दोन वर्षांपासून मात्र कुलूपबंद व्हावं ! कैसी ही आगळीक झाली गे माये, माझा वैकुंठाचा राणा रुसला गे माये ।।

यंदा आषाढी एकादशी २०२१ साठी महाराष्ट्र शासनाने नियोजित कार्यक्रम घोषित केला असून यंदा मानाच्या फक्त दहा पालख्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला एसटी बस मधून येण्याला परवानगी दिली आहे. तर वाखरी मैदानापासून मंदिरापर्यंतचे दीड किलोमीटर एव्हढे अंतर पालखीतील वारकऱ्यांना पायी चालत जायला मंजुरी दिली आहे. १९५ संत महाराज मंडळींना पांडुरंगाच्या मुखदर्शनाची संमती दिली आहे. मानाच्या दहा पालख्यांसाठी सरकारने वीस बसेसची सोय केली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत १०० वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर तपासणी केली जाईल. तसेच सर्व दक्षता आणि तपासण्या करूनच परवानगी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही सामान्य नागरिकाला दर्शन घेता येणार नाही. जवळपास नऊशे-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सामान्य भाविकांच्या अनुपस्थितीतच साजरी केली जात आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

3 Replies to “देव बंदी ही मंदिरी, कैसे जाऊ पंढरपुरी ।।”

    1. निव्वळ योगायोग . बऱ्याचवेळा असं होतं. कदाचित आपण त्याला संकेत म्हणतो. मला देवाच्या मूर्तीपेक्षा त्याच्या पर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात गूढता वाटते. नास्तिक आणि आस्तिक मध्ये आणखी एक पारदर्शी लेअर (स्तर) असतो. तो कधी नास्तिक वाटतो तर कधी आस्तिक. मी त्याच लेअरचा एक अंश आहे. देवा पेक्षा भक्तीचा प्रवास मला आकर्षित करतो.

      Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.