‘लगान’ चुकता हो गया रे भुवन…..!

सीमेवर कधी युद्धाची ठिणगी पडेल या तणावात लष्कर आहे. भारत आपल्या वरचढ होईल या तणावात पाकिस्तानचा अब्बाहुजूर चीन आहे. अमेरिकेचे लष्कर गेल्यावर काय होईल ? या तणावात अफगाण आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने सर्व भारतीय तणावात आहेत. मात्र मिस्टर परफेक्टनिस्ट अमीर खान आणि किरण राव यांच्या ‘तलाक’ने पुढे काय होईल ? म्हणून भारतीय मीडिया तणावात आहे. मी गुडघाभर पाण्यात उभा आहे, तुझ्याकडे किती पाणी साचलं ? असले भुक्कड प्रश्न विचारत मुंबई तुंबलीचे वार्तांकन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आता ‘अमीर-किरण’च्या तलाकचा विषय चघळायला मिळाला. म्हणजे मिस्टर परफेक्टनिस्टने तलाकचा ‘तुकडा’ फेकला आहे. लॉक डाऊनमुळे उपासमारी सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना त्याचं काय पडलंय….?

२००१ साली प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’ या हिंदी चित्रपटाचा ‘भुवन’ नावाचा नायक असलेल्या अमीर खानच्या दुसऱ्या लग्नाची प्रेमकहाणी पडद्यामागे सुरू झालेला हाच तो सिनेमा. ‘लगान’च्या पडद्यावरच्या प्रेमकहाणीला ऑस्करपर्यंत नेले. तर याचवेळी असिस्टंट डिरेक्टर असलेल्या किरण रावशी सूत जुळवत तिला बोहल्यावर चढवत अमीरने किरणला खान कुटुंबाची सदस्य बनवत पत्नीची रिकामी झालेली जागा भरून काढली. नट-नट्यांच्या प्रेमकहाण्या आणि त्यांची लग्ने तसेच त्यांचा ‘डिव्होर्स’ हा सिनेरसिकांचा खरंतर आवडीचा विषय आहे. कोणत्या अभिनेत्याने कोणत्या अभिनेत्रीला गटवले यापेक्षा किती वर्षे तो तिच्यासोबत राहिला ? यावर तो किती आदर्श आणि कुटुंबवत्सल आहे हे ठरविणाऱ्या भाबड्या समाजाला नेहमीच ‘चुतीया’ समजत हे नट-नट्या आपला पडद्यामागचा भोग भोगत असतात. सिनेमाचं आकर्षण असणारा समाज मात्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचत असतो. समाज-सभ्यता आणि संस्कृती याची कोणतीही चाड नसलेले हे नट-नट्या आपल्या भोंगळ जीवनवादाचे प्रदर्शन मात्र मांडत असतात. लग्न करताना जशी लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करतात तसाच प्रयत्न ते ‘डिव्होर्स’ घेताना सुद्धा करतात. यात सुद्धा त्यांचं कोणतं ना कोणतं फायद्याचं गणित असतंच. त्याला ते ‘मुक्त जगण्याचं स्वातंत्र्य’ असं बरळत आपण थोर विचारवंत असल्याचा खोटा अभिनय करत असतात.

याच अमिरखानने काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीला आणि मुलाला या देशात असुरक्षित वाटते असं विधान करून खळबळ उडवून दिली होती. आता तलाक नंतर किरण राव आपल्या लेकराला घेऊन कुठं राहणार आहे ? कदाचित आपल्या ‘डिव्होर्स’चं दुःख विसरायला दोन-चार वर्षे ती परदेशात पण जाईल. किंवा आमिरच्या ‘त्या’ विधानाशी आपला काही संबंध नाही असं म्हणून ती ‘लगीन’ तुटल्याची मिळालेली ‘लगान’ घेऊन गपगुमान इथेच भारतात राहील. आम्ही आता पती-पत्नी या नात्यापेक्षा पुढे गेलो आहोत. दोघेही सगळी कर्तव्ये पार पाडत आपला वेगळा ‘स्पेस’ जगणार आहोत. असा भलामोठा आदर्श कार्यक्रम सांगत हे पुन्हा नव्या भोगनात्याला सज्ज होणार. आम्ही मात्र त्यांच्या आयुष्यातल्या या चढउताराचा सिनेमा आपल्या डोक्यात तयार करणार.

हा सर्व प्रसिद्ध, करोडपतींच्या अस्सल जीवनवादाचा विषय मीडिया चघळत आपला टीआरपी वाढविणार. रोजच मृत्यूच्या भयाखाली उपासमार सहन करत असह्य झालेलं जगणं जगणारी माणसे हा विषय डोळ्यातील बुबुळे बाहेर पडे पर्यंत डोळे वासून पहात बसणार. आम्ही सर्वसामान्य आपल्या आयुष्यात असलं नाट्य कधीच घडू नये म्हणून आपल्या कष्टाचे आणि वेदनेचे ‘लगान’ या धनदांडग्यांकडे भरत राहणार आहे लोक स्वतःच्या माजाचे नवे समर्थन करत प्रत्येक टप्प्यावर नवा ‘लगान’ वसूल करणार. शेवटी त्यांच्या खासगी आयुष्यातील हा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा माध्यमांचा टीआरपी वाढविण्यासाठीच असतो. बाकी सरकारचा कर बुडवत संपत्तीची वाटणी करत विभक्त होण्याचे नाटक करणाऱ्या या जमातीपासून समाजाला कोणता विचारवाद अपेक्षित असतो…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

15 Replies to “‘लगान’ चुकता हो गया रे भुवन…..!”

 1. Cherry on the top – “बाकी सरकारचा कर बुडवत संपत्तीची वाटणी करत विभक्त होण्याचे नाटक करणाऱ्या या जमातीपासून समाजाला कोणता विचारवाद अपेक्षित असतो”. Achook vishleshan.

  Liked by 1 person

    1. मुखवटे धारण करून पडद्यावर भूमिका जगणारे कलाकार व्यक्तिगत आयुष्यात देखील मुखवटे चढवूनच ‘बेगडी’ आयुष्य जगत असतात. त्यामुळेच ते कलावंत म्हणून जेव्हढे मोठे असतात, तेव्हढेच माणूस म्हणून अतिशय क्षुद्र असतात.

     Liked by 1 person

      1. रुपाली मी कलाकाराचे पडद्यावरचे आयुष्य आणि व्यक्तिगत आयुष्य यावर बोललो. त्याने राबवलेल्या उपक्रमाबद्दल अथवा त्यात सहभागी लोकांबद्दल नाही बोललो. पाणी फाऊंडेशनचे काम खरोखरीच खूप चांगले आहे. त्यात सहभागी यंत्रणा देखील खूप निस्पृह आहे. यात शंकाच नाही. माझ्या लेखाचा तो विषय नाहीय.😊😊😊

       Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.