लोभी माणसांचे ‘कृष्ण विवर’ आणि कोरोना महामारी…!

‘ब्लॅक होल’ हा ब्रिटिश लघुचित्रपट लोभी माणसांचे कृष्ण विवर या थीमवर आधारित आहे. या लघुचित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळविलेले आहेत. कुठूनतरी व्हॉट्सअप वर मला या लघुचित्रपटाची दोन मिनिटांची क्लिप मिळाली. ही दोन मिनिटांची क्लिप खूप काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे या चित्रपटाची समीक्षा नक्कीच करणार नाही. याठिकाणी आपला तो विषय पण नाही. पण ती दोन मिनिटांची क्लिप सध्याच्या परिस्थितीला अगदी अचूक लागू होणारी आहे. कोरोना महामारीत प्रत्यक्ष मृत्यू प्रत्येकाच्या घराचा दरवाजा वाजवत असतानाही अडचणीत सापडलेल्या लोकांची लुबाडणूक होत असलेली आपण रोज पाहतोय. लोभी माणसांच्या मनातले कृष्णविवर कधीच भरत नसते. एकवेळ अशी येते की हे कृष्णविवरच त्या माणसाला गिळून टाकते.

अगदी या ब्लॅक होल लघुचित्रपटाच्या कथानकाशी मिळतीजुळती घटना सध्या रोज आजूबाजूला आपल्याला अनुभवायला मिळते. माणसाची आपण दोन गटात विभागणी करू शकतो. एक म्हणजे निरपेक्ष वृत्तीचा आणि दुसरा लोभी वृत्तीचा. निरपेक्ष वृत्तीची माणसे अलीकडे कमी प्रमाणात दिसतात. मात्र लोभीवृत्तीची माणसे तुम्हाला खूप भेटतील. कधी ती खूप ओळखीची, आपल्या जवळपास वावरणारी, नात्यातली किंवा रक्ताच्या नात्याची देखील असू शकतात. त्यांची लोभी वृत्ती ही पराकोटीला पोहोचलेली असते. काळ-वेळ याचं कोणतंही भान न ठेवता ते लोभापायी सतत दुसऱ्याला लुबाडताना दिसतात. त्यातच त्यांचा शेवट ठरलेला असतो.

ही लोभी माणसे सर्वत्र असतात. अगदी शिक्षित-अशिक्षित, डॉक्टर, मोठे उद्योजक, व्यापारी, क्लासवन ऑफिसर पासून ते अगदी भाजीविक्रेता, औषध विक्रेता, फळविक्रेत्यापर्यंत रोज ह्या लोभी माणसांचे विकृत चेहरे लुबाडणूक करताना दिसतात. आपल्याला त्यांचा कितीही राग आला, तिरस्कार वाटला तरी त्यांना त्याचे काहीच वाटत नसते. त्यांना पाप-पुण्याचा विचार देखील मनाला शिवत नसतो. लॉक डाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या लोकांना किराणा दुकानदार जादा दराने चीजवस्तू विकून लुबाडताना आपण रोज बघितलंय. तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देखील रुग्णांकडून उपचारासाठी मोठी रक्कम वसूल करताना पाहिलेत. या लोभी माणसांचे ब्लॅक होल कधीच भरून निघत नसते. शेवटी हे ब्लॅक होलच या लोभी माणसांना गिळून टाकते. लुबाडणूक करणाऱ्या दुकानदार, डॉक्टर, विक्रेत्यांना कोरोना होवून त्यांचा मृत्यू झाल्याच्या देखील गेल्या दीड वर्षात अनेक घटना घडल्यात. ‘ब्लॅक होल’ या ब्रिटिश चित्रपटाची मला मिळालेली दोन मिनिटांची क्लिप मी मुद्दामहून शेवटी जोडतोय. ती अवश्य बघा…म्हणजे मी जे सांगतोय ते तुमच्या काळजाला नक्कीच भिडेल.

हीच ती ब्लॅक होल लघुसिनेमाची क्लिप. नक्की बघा…..

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

6 Replies to “लोभी माणसांचे ‘कृष्ण विवर’ आणि कोरोना महामारी…!”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.