कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून वापर झालाय का…?

कोरोना महामारीच्या रूपाने चीनने जैविक अस्त्राचा वापर केल्याचे आता बोलले जात असले तरी कोणत्याही प्रकारे महायुद्ध टाळण्याची सर्व जगाचीच भूमिका असतांना थेट कुणाशीही युद्ध सुरू नसलेल्या चीनने कोरोना अस्त्राचा वापर का केला असावा ? जैविक अस्त्रानेच महायुद्धाला सुरुवात झाली आहे का ? हे जैविक महायुद्ध कितीकाळ सुरू राहील ? आणि याचा शेवट नेमका कसा असेल ? अश्या अनेक प्रश्नांची मालिकाच तयार झाली आहे. बरं जैविक अस्त्राचा वापर पहिल्यांदाच केला जात नाहीय. त्याला देखील मोठा इतिहास आहे. कोरोना पेक्षाही कितीतरी पटीने भयानक असलेल्या प्लेगचे विषाणू पसरवून नरसंहार घडवून आणण्याचे युद्धतंत्र मध्ययुगीन काळापासून चीन आणि मंगोलियन लोकांनी वापरात आणल्याचे इतिहासात दाखले मिळतात. तर जैविक अस्त्राचा मारा करण्यात जपान, अमेरिका, रशिया देखील पुढे होते याचा इतिहासात दाखला मिळतो. मात्र भूभागावरील वर्चस्व आणि धर्मद्वेषातून होणाऱ्या युध्दांमध्ये वापरल्या गेलेले जैविक अस्त्र आज चीन कोणत्या कारणासाठी वापरत आहे ?

मध्ययुगीन काळात प्लेगच्या विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून केला जाऊ शकतो हे चीन आणि मंगोलियन यांना माहीत होते. चिनी आणि मंगोली लोक हे प्लेगने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या ‘डेड बॉडीज’ शत्रूपक्षाच्या भूभागात नद्यांमध्ये, शहराच्या रस्त्यांवर सोडून देत असत. त्यामुळे संसर्गाने त्या परिसरात प्लेग पसरावा हा उद्देश असे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने चीनच्या काही भागात प्लेगच्या विषाणूंच्या संक्रमित माश्या सोडल्या होत्या. तर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया यांनी देखील प्लेगचे विषाणू असलेले हवेत मारता येणारे ‘स्प्रे’ बनवले होते अशी चर्चा त्याकाळी होती. प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या प्लेगच्या विषाणूंचा चुकूनही होणारा वापर हा जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा असेल असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून लाखों लोकांना अवघ्या काही मिनिटात ठार मारले होते. त्यामुळे सहा वर्षे सुरू असलेले महायुद्ध संपुष्टात आले होते. अणुबॉम्बचा वापर करणाऱ्या अमेरिकेला आपण आजही दोषी मानत असलो तरी जपानने अमेरिकेविरुद्ध जैविक युद्ध सुरू करण्याची जय्यत तयारी केली होती हे आपण विसरून गेलो. ‘इंपिरियल जापनीज आर्मी युनिट ७३१’ हे जपानी लष्कराचं वैज्ञानिक अस्त्रांचा शोध घेणारे पथक अत्यंत गुप्तपणे अनेकप्रकाराच्या रोगजंतूंवर प्रयोग करीत होते. लेफ्टनंट जनरल डॉ. शिरो आशिई हा नामवंत जपानी वैज्ञानिक या पथकाचा प्रमुख होता. दुसऱ्या महायुद्धात जपानने १९४१ साली अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर हल्ला करून अमेरिकन लष्कराची दाणादाण उडविली होती. पण बलाढ्य अमेरिकेसमोर आपण किरकोळ आहोत याची जपानला जाणीव होती. त्यामुळेच जपानने एक अत्यंत महत्वाकांक्षी पण तितकाच क्रूर प्लॅन आखला. २२ सप्टेंबर १९४५ च्या रात्री जपानी विमाने अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोर्निया प्रांतातील सॅन दि लॉगो शहरावर बॉम्ब फेक करणार होती. या बॉम्ब मध्ये स्फोटके नाही तर प्लेगचे विषाणू होते. ‘ऑपरेशन चेरी ब्लॉसम ऍट नाईट’ असं या मोहिमेचे नाव होते. ही मोहीम काही कारणाने जपानला कार्यान्वित करता आली नाही मात्र अमेरिकेला या शडयंत्राची माहिती झाली आणि त्यांनी ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकून जपानला धडा शिकवला.

आता मध्यपूर्व आशिया आणि युरोप खंडातील काही देशांमध्ये सीमावाद आणि वर्चस्ववादी धोरणांमधून आटोक्यात येणाऱ्या युद्धजन्य घटना घडत असल्यातरी तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती नक्कीच नाही. मग जर चीनच्या वुहान मधील व्हॉयरॉलॉजी लॅबमध्ये जन्माला घातलेल्या कोविड-19 च्या विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून का करतोय ? याकडे आता साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. विस्तारवादी भूमिकेतून चीनचे त्याच्याशेजारील पाकिस्तान सोडला तर सर्वच देशांशी तंटे आहेत. भारतही त्यात येतो. मात्र तो भारताशी थेट आण्विक अथवा जैविक युद्ध करण्याची चूक कधीच करणार नाही. कारण आण्विक आणि जैविक अस्त्रांच्या परिणामांची झळ त्यालादेखील बसेल. शिवाय भारत ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने त्याला भारताशी थेट युद्ध करण्यात नक्कीच स्वारस्य नाही. अमेरिकेचा आशिया खंडातील वाढता हस्तक्षेप हा चीन आणि रशियाचा डोकेदुखीचा विषय असला तरी केवळ या कारणासाठी युरोप खंडाला ‘कॉफीन’मध्ये ढकलण्याची चूक चीन करेल का ? बरं कोरोना वेपनच्या हल्ल्यात त्याची देखील लाखोंच्या संख्येने मनुष्यहानी झाली आहे. कोरोना विषाणूंची निर्मिती जरी चीनने केली हे आपण मान्य केले तरी त्याचा जैविक शस्त्र म्हणून वापर करताना म्हणजेच हाताळताना चीनच्या संशोधकांकडून गलथानपणा झाला हा तर्क अविश्वसनीय वाटतो. त्यामुळे स्वतःचे नुकसान करीत जगाला संकटात टाकण्याची चीनची चाल अजून संभ्रमित करणारी आहे. त्यामुळेच अमेरिका अजून कोणतीच हालचाल करताना दिसत नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

2 Replies to “कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून वापर झालाय का…?”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.