फेसबुक- डोनाल्ड ट्रम्प वाद अन भारत सरकार….!

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट दोन वर्षांसाठी बंद करीत मार्क झुकेरबर्ग यांनी थेट ‘पंगा’ घेतला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट प्रक्षोभक पोस्ट प्रकाशित केल्याचे कारण देत दोन वर्षांसाठी बंद करीत फेसबुक या समाजमाध्यमाने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अमेरिकेतील राजकीय डावपेच कोणत्या थराला जातात याचेच जगाला दर्शन झाले आहे. त्याच फेसबुकने भारतात मात्र सरकारने स्पष्ट केलेल्या दिशानिर्देश नुसार काम करण्याची तयारी दाखवत सपशेल लोटांगण घातले आहे. एकूणच राष्ट्राध्यक्षांसारख्या प्रतिष्ठेच्या पदावरून पायउतार होणाऱ्या व्यक्तीला बदनामीला सामोरे जाण्याची अमेरिकेत ही पहिल्यांदाच घटना घडत नसली तरी गेल्या पंधरा-वीस वर्षातील पदावर राहिलेल्या राष्ट्राध्यक्षांचा चरित्रपट पाहता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तेथील समाजमाध्यम देखील एव्हढे आक्रमक का होत आहेत ? हा देखील जगासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. चार वर्षांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कालावधी वादग्रस्त अवस्थेतच पूर्ण करत असतानाच दुसऱ्या चार वर्षांची टर्म मिळावी म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवा बरोबरच एव्हढ्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल याची त्यांनी तरी अपेक्षा केली असेल का ?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट दोन वर्षांसाठी बंद करण्यात आले आहे. ७ जानेवारी २०२१ पासून पुढील दोन वर्षे आता त्यांना फेसबुक वापरता येणार नाही. याच दिवशी म्हणजेच ७ जानेवारी रोजी फेसबुकने पहिल्यांदा ट्रम्प यांचे अकाऊंट एक दिवसासाठी निलंबित केले होते. त्यानंतर कारवाई करीत त्यांचे अकाऊंट आता दोन वर्षांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत आता ट्रम्प यांना सोशल मीडियाचा उपयोग करता येणार नाही. ट्विटर आणि इंस्टाग्रामने या अगोदरच ट्रम्प यांचे अकाऊंट बंद केले आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेच्या राजकारणात समाज माध्यमाने केलेली ही कुरघोडी अमेरिकेच्या राजकीय कुटील डावपेचांचे दर्शन घडविते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ६ जानेवारी रोजी कॅपिटल हिल येथे हिंसाचार उसळला होता. ट्रम्प यांनीच आपल्या समर्थकांना सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकत भडकाविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत फेसबुकने ही कारवाई केली आहे. इन्स्टाग्राम आणि युट्युबने देखील ट्रम्प यांचे अकाऊंट बंद केले आहे.

भारतात मोदी सरकारने समाज माध्यमांसाठी नवी दिशादर्शक नियमावली लागू केली आहे.

एकीकडे सोशल मीडियाची महासत्तेच्या राजकारणात कुरघोडी होत असताना भारतात मोदी सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नवी दिशादर्शक नियमावली जाहीर केली आहे. ती लागू करण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी दिला आहे. अमेरिकेत नियमावर बोट ठेवत माजी राष्ट्राध्यक्षांवर बंदीची कारवाई करणाऱ्या फेसबुकने मात्र भारत सरकारच्या नियमावलीचे पालन करण्यास सहमती दर्शविली आहे. लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य न हिरावता त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कसे व्यक्त होता येईल याकडे कंपनीचे लक्ष असल्याची भूमिका फेसबुकने भारत सरकार समोर मांडली आहे. काय आहे या नव्या नियमावलीत ? सर्व सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात त्यांचे चीफ कॉम्प्लिइन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडन्ट ग्रीवन्स ऑफिसर असे तीन अधिकारी नेमावेत. ते सगळे भारतातच राहतील, याबरोबरच त्यांचे संपर्क क्रमांक वेबसाईटवर जाहीर केले जातील. याबरोबरच तक्रार दाखल करण्याची यंत्रणा आणि त्यावरील तातडीने कारवाई करणारी यंत्रणा याबाबत कंपन्यांची स्पष्टता हवी. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बलात्कार, बाल लैंगिक शोषण, जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवणारे कंटेंट ओळखून अश्या पोस्ट हटविण्याची कारवाई करणे यासह प्रमुख अटी या दिशानिर्देशात आहेत.

म्हणजेच भारतात व्यवसाय करायचा असेल तर केंद्रसरकारच्या अटींसह समाजमाध्यमांना कार्यरत रहावे लागणार आहे. काही कंपन्यांनी याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असले तरी फेसबुकने या दिशा निर्देशाला तत्वतः मान्यता देत भारत सरकारशी चर्चा सुरू केली आहे. अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्याची कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर भारतात सरकारच्या अटींवर व्यवसाय करण्याचा ‘यु टर्न’ घेणाऱ्या फेसबुकबद्दल आता अमेरिकेत युजर्स कोणता विचार करत असतील ? एकूणच जगभरात सोशल मीडियाची सत्ताधीशांवर मजबूत होणारी पकड काय सांगू पहात आहे…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

2 Replies to “फेसबुक- डोनाल्ड ट्रम्प वाद अन भारत सरकार….!”

 1. Chhan vivechan aahe. Facebook kay kivha itar multinational companya kay kivha itar deshateel sarkare kay sagle mulatach bharata kade ek mothi bajarpeth mahnoon baghtat. Deshache ani barobar lokanche bhale yache vichar te karnarch nahi. Yah goshti che mool sarkar la mahit aahe. Mahantat na “charity begins at home, and justice begins next door.” Sagle swarth sadhnar.

  Like

  1. अगदी बरोबर रुपाली. भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणूनच नाही तर नवशिक्षित बुद्धीचा खजिना म्हणून या मल्टी नॅशनल कंपन्या पाहतात. इथे स्वस्तात काम करणारी माणसे उपलब्ध होतात. एकतर त्यांना गलेलठ्ठ पॅकेजचे आमिष दाखवून ते त्यांच्या देशात स्थलांतरित करतात. किंवा इथे भारतातच ती शक्ती कशी उपयोगात आणता येईल याचा प्लॅन अंमलात आणतात. वाढती शिक्षित बेरोजगारी हा सरकारच्या हाताबाहेर गेलेला विषय आहे. त्यामुळेच सरकारला अशा मल्टी नॅशनल कंपन्यांना देशात व्यवसायासाठी रेड कार्पेट अंथरावे लागते.

   mukund hingne

   Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.