सरकार तेव्हढे ‘शहाणे’…..बाकी सारे ‘मुर्ख’च…!

वेळ पडली तर मुंगीसुद्धा तिच्यावर पडणाऱ्या संकटाला फेकून देतेच की…..

कधीतरी मध्यरात्रीपासून जमावबंदी किंवा संचारबंदी फारच गंभीर स्थिती निर्माण झाली म्हणून लॉक डाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा काही तास अगोदर केल्या जाते. मग ती घोषणा शेवटच्या माणसापर्यंत समजायच्या आताच अंमलबजावणी सुरू होते. मग कायदा मोडला म्हणून दंडात्मक कारवाईचे बुलडोझर फिरवले जातात. सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या देशात हे घडू शकते का ? तर याचे उत्तर लोकशाही असलेल्या देशातच हे घडू शकते, असेच द्यावे लागेल. कारण अध्यक्षशाही अथवा हुकूमशाही असलेल्या देशात एकच व्यक्ती कुठल्याही परिणामांची फिकीर न करता ‘घोषणा’ करीत असतो. अश्या ठिकाणी नागरिकांच्या मताला काही किंमत नसते. किंबहुना नागरिकांचे मत गृहीत धरले जात नसते. मात्र लोकशाही असलेल्या देशातील जनता ही दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदानासाठी का होईना ‘राजा’ समजली जाते असते. त्यामुळेच लोकशाहीत मतदारांचे मत सत्ताधीशांनी विचारात घ्यावे अशी एक सामान्य समजूत आहे. तरी पण सत्ताधीश मतदारांना न विचारताच निर्णय घेत असतील तर एकतर सत्ताधीश म्हणजेच सरकार ‘शहाणे’ आहे आणि जनता ही ‘मूर्ख’ आहे असेच समजावे लागेल. अश्यावेळी जनतेची ‘मूर्ख’ मते विचारात न घेताच सरकारला ‘शहाणपणा’चे निर्णय घ्यावे लागतात. सरावलेल्या लोकशाहीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये हेच घडते. तरी देखील असहाय्यपणे परिस्थिती बदलण्याची वाट पहात बसलेल्या मुंगीने सर्व ताकदीनिशी तिच्या अंगावर कोसळणाऱ्या संकटाला फेकून द्यावे अगदी तसेच जनतेने वागावे असेच सरकारला वाटत असते. म्हणूनच जनतेच्या कुठल्याही प्रतिक्रियेची वाट न पाहता सरकार निर्णय घेत असते.

सरकारने अचानक लॉक डाऊन पुकारले तरी जनतेने निमूटपणे कायदा पाळायचा असतो. घरात महिनोंमहिने स्वतःला कोंडून घ्यायचे असते. थोडीशी उपासमार घडली तर लगेच आरडाओरड करायची नसते. हॉस्पिटलमध्ये अचानक औषधांचा तुटवडा निर्माण झाला तर उपचाराविना स्वतःचा बळी द्यायचा असतो. सीमेवर ड्युटी करणारे जवान बघा….अचानक शत्रूने डोक्यावर ‘बॉम्ब’ जरी टाकला. तर छिन्नविच्छिन्न होतील पण सरकारच्या विरोधात कधी तक्रार करणार नाहीत. मग औषधाविना, उपचाराविना एखादा दुर्बल, रोगी, कमकुवत हृदयाचा माणूस तडफडून मरत असेल तर त्याच्याविषयी एव्हढी सहानुभूती का दाखवायची ? मरू द्यायचं त्याला….सरकारकडे अनेक जबाबदाऱ्या असतात. सरकारने कुठवर तुमच्याकडे लक्ष द्यायचं ? कोविड महामारीचे संकट आले म्हणून सरकारने त्यात किती गुंतून पडायचे ? त्यांचेही प्रयत्न सुरू आहेतच. तुम्ही कमकुवत असल्याने मरताय ! त्याला त्यांनी काय करायचं ? सरकारने फक्त राजकारण करायचं असतं. तोच त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यांचा अधिकार हिसकावून घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात सरकार विरोधात तक्रार करता…याला काय अर्थ आहे ? सर्वोच्च न्यायालय म्हणजे घरातील ज्येष्ठ सदस्य, त्याची प्रत्येक गोष्ट घरातील कमावत्या सदस्याने ऐकायलाच पाहिजे असा हट्ट का ? शेवटी कमावत्या सदस्यालाच घरात किंमत असते ना ? तेंव्हा आता गपगुमान संकटाशी सामना करायला सज्ज व्हा. त्या मुंग्यांकडे पहा…मेंदू न चालवता एकामागोमाग एक फक्त ‘ऑर्डर’ फॉलो करीत चालत असतात. संकट अचानक डोक्यावर कोसळलं तर हजारो मुंग्या जागेवरच गतप्राण होतात. पण दुःख करत न बसता उरलेल्या मुंग्या पुढे चालत राहतात. आणखी किती समजून सांगायचं तुम्हाला…? शेवटी सरकार तेव्हढे शहाणे बाकी सारेच…..मूर्ख !

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

14 Replies to “सरकार तेव्हढे ‘शहाणे’…..बाकी सारे ‘मुर्ख’च…!”

  1. वैतागून लिहीलं कि, ते अशा स्वरुपात बाहेर येतं…..आता वैतागून असंाच एक दिर्घांक लिहा……जरा हटके👍👍👍

    Liked by 1 person

  2. आपल्या डोक्यातून सरंजामशाही पध्दती अजून गेली नाही व घालवण्याचा जाणीव पूर्वक
    प्रयत्नही केला जात नसल्याने आमच्यातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी
    हुकूमशहाप्रमाणे व प्रजा आज्ञापालकाप्रमाणे वागताना बहुतांशी दिसून येते.

    Liked by 2 people

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.