समजा, चीननेच कोरोनाचा विषाणू जन्माला घातला…..पुढे काय ?

गेल्या दीड वर्षांपासून चीन आणि विशेषतः चीनमधील वुहान शहर जगभर विशेष चर्चेत आले आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यू आय व्ही) या प्रयोगशाळेतील तीन कर्मचारी संसर्गजन्य आजाराने हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर चीन प्रशासनाने ‘त्या’ तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे जाहीर करीत उपचार सुरू असल्याचे सूतोवाच केले. त्यानंतर अचानक युरोपीय देशांमधून कोरोना संक्रमणाची लाट उसळली. या दरम्यान चीन देशांतर्गतही कोरोना मोठ्या प्रमाणात फैलावला होता. मात्र चीन प्रशासनाने याबाबतची माहिती जगाला समजू नये यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वु हानच्या प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या संशोधकाचा हवाला देऊन एक पोस्ट जगभर व्हायरल झाली. वुहानच्या प्रयोगशाळेतच कोरोना विषाणूवर संशोधन करीत असतांना चुकीच्या हाताळणी मुळे प्रयोगशाळेतील तिघा कर्मचाऱ्यांना बाधा झाली. डिसेंबर २०१९ अखेर वुहान शहरात कोविड 19 या व्हायरसची पहिल्यांदाच नोंद करण्यात आली.

वु हान मधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही प्रयोगशाळा.

त्यानंतर जगभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने महामारीचे स्वरूप धारण केले. पहिल्यांदाच जगासमोर आलेल्या कोरोना विषाणूच्या या भयानक ताकदीची संशोधक-अभ्यासकांना देखील कल्पना आलेली नव्हती. त्याला प्रतिबंधित करणारी लस अथवा औषधी देखील नव्हती. त्यामुळेच या साथीने वेगाने पसरत महामारीचे रूप घेतले. जगाच्या संशयित नजरा आपल्याकडे वळल्यात हे लक्षात आल्यानंतर चीनमधील शास्त्रज्ञाने कोरोना विषाणू हा वटवाघूळापासून दुसऱ्या प्राण्याच्या माध्यमातून मानवामध्ये संक्रमित झाला असावा हा तर्क मांडत वुहान मधील व्हायरॉलॉजीच्या प्रयोगशाळेतील प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हा तर्क जागतिक आरोग्य संघटनेला देखील मान्य झाला नाही. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने हा विषाणू जगभर पसरविल्याचा पहिल्यांदा आरोप केला. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत हा आरोप राजकीय स्टंट समजल्या गेला. त्यामुळे चीन या प्रकरणावर मौन धारण करीत तयार केलेली प्रतिबंधात्मक लस जगाच्या बाजारात आणण्यासाठी मदतीचा साळसूदपणा दाखवायला सज्ज झाले.

आता जगभर लसीकरणाचे वारे वाहू लागले आहे.

चीनवर केलेल्या आरोपावर पडदा पडतोय असे वाटत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन गुप्तचर संघटनेला या प्रकरणी तपासाचे आदेश दिले असून ९० दिवसांचा कालावधी दिला आहे. याचबरोबर चीन प्रशासनाला तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अर्थात चीन या आवाहनाला कदापिही प्रतिसाद देणार नाही उलट तो कांगावा करेल हे अमेरिकेला माहिती आहे. किंबहुना चीन प्रशासनाने प्रतिक्रिया देणारी कारवाई करावी हाच अमेरिकेचा अंतस्थ हेतू आहे. महासत्ता असणारे दोन देश आता आमनेसामने आले असले तरी या दोघांपुरताच हा संघर्ष राहणार नाही. काहीही करून अमेरिका त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल चीन विरोधातच तयार करेल याची भीती चीनला आहे आणि हेच उघड सत्य आहे. त्यामुळे चीन देखील या कारवाईला आणि तपास अहवालाला जुमानणार नाही. आता यातून बरेच प्रश्न निर्माण होणार आहेत.

चीनने जनुकीय शस्त्र म्हणून कोरोना विषाणूचा वापर केला आहे का…?

सर्वप्रकारच्या घातक शस्त्रांच्या निर्मितीनंतरही युद्धखोर देश थांबलेले नाहीत. गेल्या वीस वर्षांपासून इराण-इराक युद्धापासूनच जैविक शस्त्रांची भाषा करणारे देश एकमेकांना धमकी देताना आपण पाहिले आहेत. मात्र आजपर्यंत जेनेटिक इंजिनिअरिंगच्या आधारे संशोधन करून जगाला वेठीस धरणारे जेनेटिक वेपन (जैविक शस्त्र) तयार करून त्याचा वापर केल्याची घटना अद्याप तरी समोर आलेली नाही. त्यामुळे समजा चीनने जैविक हत्यार म्हणून कोविड-19 विषाणूचा वापर केला हे जरी अमेरिकेने जगासमोर आणले तरी चीनला त्याची कोणती शिक्षा आणि कशी दिली जाणार ? मुळात हा न्यायनिवाडा जगाच्या अश्या कोणत्या लवादा समोर होणार ? ज्याला चीनची ही मान्यता असेल ? वर्षानुवर्षे आरोप आणि पुरावे गोळा करण्यात वाया गेल्यानंतर जरी चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले तरी शिक्षा कोणत्या प्रकारची दिली जाईल ? महायुद्धामध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर अमेरिकेने किती वर्षांनी पश्चाताप व्यक्त करीत जगाची माफी मागितली होती ? बरं याची अमेरिकेला किंवा दोस्त राष्ट्रांना कोणती शिक्षा आणि कुणी दिली होती ? मग खरंच आता जर चीनने कोरोनाचा जैविक हत्यार म्हणून वापर केला असेल तर अमेरिका त्याला निस्पृहतेने शिक्षा करू पहात आहे ? एकूणच महासत्तांच्या वर्चस्ववादी युद्धखोरीमुळे संपूर्ण जगच विनाशाच्या खाईत लोटले जाईल. तूर्तास एव्हढेच.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

6 Replies to “समजा, चीननेच कोरोनाचा विषाणू जन्माला घातला…..पुढे काय ?”

 1. सध्या जग अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर असून ते राज्यकर्त्याऐवजी भांडवलदारांच्या
  ईशा-याने वाटचाल करत आहे. भांडवलदारांचा फक्त नफ्यावर डोळा असतो, मानवतेला
  त्यांच्याकडे थारा नसल्याने राज्यकर्त्यांना यापूढील येणा-या घटना व संकटाकडे
  असहाय्यपणे पाहण्याशिवाय पर्याय दिसत नाही. सत्ता संघर्षापेक्षा भांडवली
  संघर्ष घातक असतो, भांडणामध्ये भान नसते त्यामुळे भांडवली संघर्षातून जैविक व
  रासायनिक आयुधांचा वापर होऊन जग विनाशाच्या दिशेने वाटचाल करेल असेच वाटते

  Like

  1. खरंच सर, अगदी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केलीत. सत्ताधीशांची भांडवलशाही
   वृत्ती जगालाच वेठीस धरत आहे. पण शेवटी हे कुठेतरी थांबणार आहे की असेच सुरू
   राहणार ? हाच खरा प्रश्न आहे.
   mukund hingne

   Like

 2. जर चीनला शिक्षा होऊ शकत नसेल तर किमान तरी त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. जर त्याने जैविक हत्यार बनविले असेल तर ते मानवतेच्या विरोधात आहे. लाखो लोक मरण पावले आहेत आणि मरत आहेत.

  Like

  1. हेच तर व्यापारी युद्ध आहे. आशियातील देशांनी चीनवर बहिष्कार टाकला की अमेरिका, फ्रांस, जपान यांना मोठी बाजारपेठ मिळेल. रशिया या प्रकरणात तटस्थ राहील. चीनची मदत स्वीकारलेले पाकिस्तानासारखे देश चीनची व्यापारी भूक भागवू शकत नाहीत. अश्यावेळी चीन भारताच्या बाजारपेठेवर अतिक्रमण करू नये म्हणून आपोआप भारत अमेरिकेच्या बाजूने उभा राहील. एकूणच चीनला एकटे पाडण्याचा डाव साधला जावू शकतो.

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.