जनजीवन सुरळीत होताना बेशिस्तीचा बाजार उघडू नका…..!

लॉक डाऊनमध्ये शिथिलता दिली की लगेचच बाजारात गर्दी केली जाते.

कोरोनामुळे एक मात्र चांगले झाले. सोशल डिस्टनसिंगचे महत्व समजले. अर्थात मृत्यू मानगुटीवर बसला तरी केवळ ‘इगो’ सांभाळायचा म्हणून सोशल डिस्टनसिंग न पाळणारे आहेतच. त्यांच्यामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही. पण काही प्रमाणात का होईना शिस्त लागतेय हे मान्यच करावे लागेल. आता जेंव्हा लॉक डाऊन पूर्णपणे हटविण्यात येईल तेंव्हा बाजारपेठही ठराविक वेळेतच उघडण्याची व्यापारी-व्यावसायिकांनी सवय करावी. अनावश्यक मध्यरात्रीपर्यंत बाजार खुला ठेवून आपण सामाजिक स्वास्थ बिघडवत आहोत. आता सरकारने बाजारपेठेची वेळ सक्तीने नेमून द्यावी.

माणसांच्या गर्दीमध्ये आणि जनावरांच्या कळपामध्ये मूलभूत फरक असतो. जनावरे आपल्या मेंदूचा जास्तप्रमाणात वापर करत नसावेत किंवा त्यांना माणसांसारखा ‘इगो’ नसावा. त्यामुळेच ते नेमून दिलेल्या दिशेने आणि ठरवून दिलेल्या अंतराने चालतात. माणसांचं तसं नसतं. जवळपास दीड वर्षांपासून सततच्या लॉक डाऊनमुळे माणसे जास्तच ‘आत्ममग्न’ झाल्यासारखी वागू लागली आहेत. गर्दीमुळे कोरोना फैलावतो आणि मृत्यूचे कारण बनतोय हे सांगूनसुद्धा अजूनही बाजारातील गर्दी हटलेली दिसत नाही. देवीच्या रोगासारखे कोरोनाचे उच्चाटन व्हायला अजून काही वर्षे लागतील. त्यामुळे प्रभाव कमी झाला म्हणून लॉक डाऊन जरी हटविले तरी कोरोनापासून सुटका होणार नाही. जोपर्यंत त्याच्यावर योग्य उपचार आणि औषध येत नाही निदान तोपर्यंत तरी या दडपणाखालीच जगावे लागणार आहे.

काही भागातून बऱ्यापैकी शिस्त अंगवळणी पडल्याचे दिसत आहे.

लॉक डाऊनच्या शिथिलतेच्या काळात आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सरकारने चार ते पाच तासांच्या कालावधीसाठी दुकाने उघडी ठेवण्याची व्यापारी-व्यावसायिकांना परवानगी देताना त्यांना स्वतःच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची सक्ती केली होती. सुरुवातीला हे अन्यायकारक वाटले असले तरी त्याचा अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यामुळे दुकानदारांना दिलेल्या वेळेत व्यवसाय करण्याची सवय लागली. याबरोबरच वेळेत कपात केली असली तरी विक्रीमध्ये फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले आहे. दररोज चार ते पाच तास दुकाने उघडी राहण्याची सवय झाली तर त्याच वेळेत येवून ग्राहक आपल्याला लागणाऱ्या वस्तू खरेदी करेल. शिवाय दररोजच्या खरेदीसाठी बारा ते चौदा तास बाजार खुला ठेवण्याची गरजच काय ? शेवटी व्हायचा तेव्हढाच व्यवसाय होत असतो. दुकाने किती तास उघडी ठेवली यावर विक्री अवलंबून नसते हेच सिद्ध झाले आहे. ज्याठिकाणी आवश्यक आहे त्याठिकाणी म्हणजे रेल्वेस्टेशन, बसस्टँड परिसरातील हॉटेल, दुकाने वेळ वाढवून खुली ठेवण्यास हरकत नसावी. मात्र एकदा लोकांना वेळेत खरेदी करण्याची सवय लागली तर याचीही गरज भासणार नाही. रात्री-अपरात्री बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी म्हणूनच स्टँड आणि स्टेशनच्या परिसरातील हॉटेल्स जादावेळ सुरू ठेवावीत.

सुरुवातीला थोडेसे जाचक वाटत असले तरी वेळेचे नियम घालून ‘स्टार्ट अप’ केला तर….

सगळ्यात पहिल्यांदा उत्पादक कंपन्यांनी आपल्या मार्केटिंगच्या फंडा बदलायला हवा. वेगवेगळी प्रलोभने दाखवीत जास्तीतजास्त विक्रीचे उद्दिष्ट बाजूला ठेवून ‘गुणवत्तापूर्ण’ विक्रीसाठी विक्रेत्यांना प्रवृत्त करावे. याबरोबरच बाजारातील मागणी प्रमाणेच उत्पादन करावे. जादा उत्पादन करणे ही जर उत्पादकांची तांत्रिक गरज असेल तर नव्या बाजारपेठेचा शोध घेणे देखील त्यांच्यासाठी बंधनकारक असावे. गर्दीला आकर्षित करणारे विक्रीचे तंत्र उत्पादकाला दीर्घकाळ फायद्याचे ठरत नाही. याउलट गुणवत्तेला प्राधान्य देणारा ग्राहक उत्पादकाला दीर्घकाळ फायदा देत असतो हेच आता सिद्ध झाले आहे. एकूणच आता लॉक डाऊनच्या काळात जे नियम आणि सवयी अंगवळणी पडत आहेत त्यांना अधिक बळकटी देणारे मार्केटिंग आता अपेक्षित आहे. तरच लॉक डाऊन नंतर पूर्वपदावर येताना नव्याने ‘स्टार्ट अप’ करीत समाजाचे स्वास्थ्य अबाधित ठेवल्याचे देशकार्य घडेल….!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

8 Replies to “जनजीवन सुरळीत होताना बेशिस्तीचा बाजार उघडू नका…..!”

 1. गर्दी टाळण्यासाठी उत्पादक,विक्रेते व ग्राहकांनी सामाजिक हिताला प्राधान्य
  दिले तर सर्वांचेच व्यवहार सुरळित होतील, स्वार्थासाठी कोणीही जबाबदा-या टाळू
  नयेत

  Liked by 1 person

  1. पूर्वीच्या सवयी बदलतील अशी अपेक्षा करताना सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा या महामारीपासून आपण काहीच बोध घेतला नाही असे होईल.

   mukund hingne

   Liked by 1 person

    1. हं , आम्हाला आमच्या सोयीचे लॉक डाऊन हवे असते. आम्ही आमच्या कोणत्याच सवयी बदलणार नाही आहोत. वाटल्यास सरकारने किंवा कोरोनाने बदलावे.😢😢😢 mukund hingne

     Liked by 1 person

      1. अगदी बरोबर बोललीस रुपाली…..आपल्या चौकटीच्या बाहेर न पडण्याच्या गुणधर्मामुळे आडमुठेपणाची वृत्ती तयार होते. भारतीय लोकांना कोणतीही चांगली सवय अंगवळणी पडायला खूप काळ जावा लागतो. इतर गोष्टींचं चटकन अनुकरण करताना चांगल्या गोष्टी स्वीकारायला वेळ लागतो हेच अनाकलनीय आहे. mukund hingne

       Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.