लॉक डाऊन अन भटक्या कुत्रीची प्रसूती….!

नेहमी धटिंगणासारखं दारासमोर आशाळभूतपणे काहीतरी खायला मिळेल म्हणून उभ्या राहणाऱ्या 'त्या' कुत्रीने दोन-चार वेळा माझ्याकडून पेकाटात चार काठ्यांचा मार खाल्लेला होता. तेंव्हापासून मी रात्री उशिरा घरी येत असताना मुद्दाम माझ्यावर भुंकून आपला निषेध नोंदवत असायची. काल मात्र अतिशय दिनवाणी नजरेने माझ्याकडे बघत ती संध्याकाळी अंगणात उभी होती. मी देखील जरा दुर्लक्षच केलं. चांगलं गरोदरपणातील फुगलेलं पोट घेवून ती जिन्याच्या खाली मुक्काम ठोकू पहात होती. लॉक डाऊन मध्ये बिचारी कुठं जाणार..? भटक्यांना स्वतःचे निवाऱ्याचे ठिकाण कुठे असते...?
जिन्याखालीच तिनं पाच पिलांना जन्म दिला…

केवळ भूतदया म्हणूनच मी ‘अडलेल्या’ त्या कुत्रीला काठीने मारून हुसकावले नाही. भटकी असली तरी गरोदर होती म्हणून कदाचित शहाण्या माणसांचे सोकॉल्ड ‘संस्कार’ तिला माहीत असावेत. शिवाय माणसांसाठी पुकारलेल्या ‘लॉक डाऊन’ची तिला अडचण असण्याचं काहीच कारण नव्हतं. तिला कुणी पाळलं नव्हतं. पाळीव असती तर तिच्या गरोदरपणात काळजी घेणारे तिच्या अवती-भवती रेंगाळताना दिसले असते.

या कुत्र्यांचं एक बरं असतं…. माणसांसारखं त्यांना आई-बाप, जात, धर्म कुणी विचारत नाही. नाही म्हणायला प्रदेश विचारत असतील. म्हणूनच एका गल्लीतील भटके कुत्रे चुकून जरी दुसऱ्या गल्लीत गेले तर त्या गल्लीतील कुत्र्यांची टोळी एकजुटीने पिटाळून लावते. त्यामुळे त्यांच्यात ‘प्रदेश’नियम पाळत असावेत असा माझा अभ्यास सांगतो. तर जिन्याखाली आसरा घेतलेल्या ‘त्या’ भटक्या कुत्रीने रात्रीच पाच पिलांना जन्म दिला. सकाळी जाग आल्यावर ‘कु-कु’ आवाजाने माझं जिन्याखाली लक्ष गेलं, तर बाईसाहेब पाच पिलांना जन्म देऊन तिथंच चार पाय ताणून झोपलेल्या दिसल्या.

डोळेही न उघडलेल्या पिलांना भूक लागल्यावर दूध प्यायचं कसं कळत असावं….

परवा लॉक डाऊनमुळे दुकाने बंद असल्याने त्याच्या पाळलेल्या डॉगीसाठी बिस्किटे मिळत नसल्याची तक्रार करत होता. लॉक डाऊनमुळे पाळीव प्राण्यांचे खाण्याचे हाल होत आहेत. त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ‘अत्यावश्यक’ सेवेत पशुखाद्य आणि उपचार यांचा समावेश केला जावा असं निवेदनही त्याने कलेक्टरला दिले होते. पाळलेल्या ‘डॉगी’साठी त्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पण भटक्या कुत्र्यांचं काय..? अगदी भटक्या माणसांसारखंच..! लॉक डाऊनच्या काळात देखील दवाखान्या शिवाय जिन्याखाली प्रसूतीनंतर बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

12 Replies to “लॉक डाऊन अन भटक्या कुत्रीची प्रसूती….!”

  1. रुपाली, वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आवडला तर फक्त लाईक-कमेंट न करता इतरांना पण ब्लॉग फॉलो करायला सुचवा. सध्या फॉलोअरची पण गरज आहे. जेव्हढे वाचक मिळतील तेव्हढा लिखाणाचा उत्साह वाढेल. असो. खूप धन्यवाद. mukund hingne

   Liked by 1 person

    1. रुपाली, जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपला तोंडवळा, नाव आणि आपली मातृभाषा आपण ‘मराठी’ असल्याची ओळख देतात. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. शिवाय मी मराठी भाषेतूनच काम करीत असल्याने माझा इतर भाषांशी फारसा संबंध आला नाही. आता काहीशी अडचण होते पण त्यातून मार्ग काढत पुढे जातो. पण मराठी असल्याचा अपमान वाटत नाही. जगाच्या पाठीवर जिथे-जिथे मराठी माणूस पोहोचला तिथे त्याने मराठी भाषा सोबत नेली. मला त्यांच्याशी संपर्कात राहून भाषा अधिक खुलवायची आहे. म्हणून तर या ब्लॉगच्या भानगडीत पडलोय. 🙏🙏🙏

     Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.