कोरोना प्रभावहीन होतोय हा ऋतुबदलाचा फायदा की प्रयत्नांचा…?

दिवसभर ढगाळ वातावरण तयार झाल्याने उष्म्यापासून सुटका होतेय आणि वेळेवर मान्सून येण्याची शक्यता वाढलीय.
  • वातावरणातील बदल आणि कोरोनाच्या प्रभावातील बदल या दोन्हीही घटना २४ मे रोजी घडल्यात.
  • नेहमी तापमानाचे रेकॉर्डब्रेक करणाऱ्या विदर्भात या वर्षी पारा ४२.५ अंशाच्या पुढे सरकला नाही. गतवर्षी ४७.३ अंश सेल्सिअस एव्हढे तापमान नोंदविणाऱ्या विदर्भात यंदा उष्णतेचा पारा घसरला. हा सुखद अनुभव मिळाला तो २४ मे २०२१ या दिवशी.
  • तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात बाधित आणि बळींची आकडेवारी कमालीची घसरली तो दिवस देखील २४ मे २०२१ हाच. महाराष्ट्रात जवळपास १६ ते १८ जिल्ह्यात आणि शहरात २४ मे रोजी कोरोनाचा एकही बळी गेल्याची घटना नोंदविली गेली नाही. हा सुखद अनुभव देखील २४ मे रोजी अनुभवायला मिळाला.

उन्हाळा अनुभवावा तो महाराष्ट्रात असं म्हणतात. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर हे जिल्हे म्हणजे उष्णतेचे रेकॉर्डब्रेक तापमान नोंदविणारे जिल्हे म्हणून ओळखले जातात. उष्णता अनुभवायची असेल तर उन्हाळ्यात या जिल्ह्यात मुक्कामाला जावून दाखवा असं गंमतीने म्हंटल्या जातं. थोडक्यात उन्हाळ्यात निसर्गाचा रौद्र अवतार पहायला मिळणारे हे जिल्हे आहेत. गेल्या दहा वर्षांत उत्तरोत्तर तापमानाचा पारा वाढविणाऱ्या या जिल्ह्यात यावर्षी तापमान ४२-४३ अंशाच्या पुढे सरकलेले नाही. हा बदल नेमका कशामुळे झाला असावा ?

उत्तराखंड राज्यातील जोशीमठ तालुक्यात हिमकडा कोसळून ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेकडे केवळ दुर्घटना म्हणून न पाहता वातावरणातील बदल घडविणारी घटना म्हणून नोंद घेणे आवश्यक आहे. हिमकडा कोसळल्याने बर्फ वितळून नद्यांना महापूर आला होता. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वातावरणात निर्माण होणाऱ्या गारव्याने उष्णतेच्या पाऱ्याला उसळी मारायची संधी मिळाली नसावी म्हणूनच यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट उसळली नसावी असा एक तर्क मांडल्या जावू शकतो. तर गत सप्ताहात अरबी समुद्रात उसळलेल्या तौक्ते चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात उसळलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय उपखंडात या उन्हाळ्यात उसळू पाहणारा उष्णतेचा पारा एकदम घसरला हा एक तर्क असू शकतो. तर कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून जगभर वेळोवेळी पुकारलेल्या लॉक डाऊनमुळे वातावरणातील प्रदूषण कमी झाले तसेच ओझोनचा स्तरही वाढला असल्याने यावर्षी जगभरच वातावरणातील बदलामुळे उष्णतेमध्ये फरक पडला असल्याचाही एक तर्क मांडल्या जातो. आता भारतात उष्णतेची लाट आणि कोरोनाची दुसरी लाट दोन्हीही एकाच दिवशी घसरल्याने एकमेकांशी संदर्भ लावण्याची शक्यता अगदीच अतर्क्य ठरू शकणार नाही.

आता भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बाबत बोलायचे झाल्यास लॉक डाऊनच्या काळात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सुचविलेले उपाय गंभीरतेने न पाळल्याने कोरोनाची दुसरी लाट उसळली असा एक तर्क मांडला जातो. तर पहिल्या टप्प्यातील कोरोना पेक्षा दुसऱ्या टप्प्यातील कोरोना आपले रूप पालटून अतिवेगाने स्थिरावत असल्याने दुसरी लाट वेगाने उसळली असा ढोबळमानाने तर्क मांडल्या जातो. तर सरकारी यंत्रणा वैद्यकीय सुविधा आणि लसीकरणामध्ये सपशेल अपयशी ठरल्याने भारतात कोरोनाची दुसरी लाट उसळली असाही तर्क मांडला जातो. मात्र गेल्या महिनाभरापासून विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचा कहर टिपेला गेलेला असतांना २४ मे रोजीचा आकडेवारीचा अहवाल हा निश्चितच दिलासा देणारा ठरला आहे. एकूणच ‘जादूची कांडी’ फिरावी तसा कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तर त्याकरिता होणारे सरकारी यंत्रणेचे प्रयत्न, जनजागृती यामुळेही हा अपेक्षित परिणाम दिसत आहे. बाधित रुग्णांनी गच्च भरलेल्या हॉस्पिटल मधून आता उपचार सुविधा देखील तत्परतेने मिळत आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीव्हर, वेगवेगळ्या तपासण्या आणि चाचण्या तत्परतेने होवू लागल्या आहेत. लसीकरणालाही येत्या काही दिवसात अपेक्षित वेग मिळेल याची आरोग्ययंत्रणा आणि नागरिकांना देखील खात्री वाटत आहे. एकूणच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला कोसळलेली शासकीय यंत्रणा आता पुन्हा सावरली आहे. एव्हढेच तूर्तास……

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

8 Replies to “कोरोना प्रभावहीन होतोय हा ऋतुबदलाचा फायदा की प्रयत्नांचा…?”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.