मृत्यू बघून डोळ्यातील पाणी आटलंय… आता धुवांधार पाऊस हवा…!

आग ओकणाऱ्या सूर्याच्या दाहकतेने करपलेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटण्यासाठी पावसाचा शिडकावा हवा.

एकीकडे कोविड महामारीने दीड वर्षांपासून थैमान घातलंय. सगळं जग एका जागी थांबलंय. रोजच मृत्यूचा शोक करून डोळे कोरडे पडलेत. डोळ्यातलं पाणी आटलंय…. वातावरणात चहुबाजूंनी उष्णता भरलेली. डोक्यावर आग ओकणारा सूर्य अन तहानलेली व्याकुळ सृष्टी. पाण्याच्या एका थेंबाची प्रतीक्षा करीत पानझडी झालेल्या निष्पर्ण झाडांचे सांगाडे….तीच अवस्था माणसांची. जिथे फक्त उन्हाळा आणि कडक उन्हाळा असे दोनच ऋतू असतात. पावसाच्या आगमनाची खरी प्रतीक्षा तर याच प्रदेशाला असते. दरवर्षी हुलकावणी देत सरासरी पेक्षाही कमी हजेरी लावणाऱ्या पावसाची वाट पहात राहणे हा देखील एक मोसमच म्हंटला पाहिजे. विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी तर पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. कधीतरी परमेश्वराला दया येईल अन तो अगदी वेळेवर जमिनीची अन मनुष्यदेहाची तहान भागविणाऱ्या जलधारांना मुक्तपणे बरसवेल…… टिव्हीतल्या दुपारच्या चर्चासत्राची सुरुवात करताना निवेदिका स्क्रिप्ट वाचत म्हणाली.

कोरोना तर जाणार नाहीय. कधी न कधी तो प्रत्येक शरीराचा ताबा घेऊन पोखरणार आहे. त्याला सोबत घेऊनच जगण्याची सवय करावी लागणार आहे. त्याच्याशी दोनहात करून लवकरच त्याला हरवू सुद्धा पण त्याआधीच पावसाने हरवलं तर…? माणसांनी पापं खूप केलीत म्हणून तर देवाचा प्रकोप होतोय…… टीव्हीवर कुणीतरी भविष्यवेत्ता शापीत वाणी सांगत होता. कोरोना पण देवानेच माणसांना दिलेला शाप आहे म्हणे……माणसं एकमेकांच्या जीवावर उठतील…रक्ताचे पाट वाहतील….सगळीकडे आगीचे गोळे पडतील….वणवा पेटेल ही मागच्यावर्षी केलेली भविष्यवाणी खरी झाली की नाही..?….टिव्हीवरचा तो भविष्यवेत्ता गरजला. समोर बसलेल्या सगळ्या भक्तांनी माना डोलावल्या. आता यंदा पाऊस पण कोपला तर…?

काळ्याशार ढगांनी सूर्याला पण झाकून टाकू देत….पण यंदा पाऊस हवा.

टीव्हीवरच्या त्या चर्चासत्रात भविष्यवेत्त्याची बतावणी खोडून काढणारा एक विज्ञानवादी हस्तक्षेप करीत म्हणाला….यंदा पाऊस अगदी वेळेवर पडणार आहे. दीड वर्षांपासून माणसांकडून होणारं पर्यावरणातील प्रदूषण खूप कमी झालंय… ओझोनचा स्तर पण चांगला झालाय. आता प्रशांत महासागरावर ‘अलनिनो’ची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे पावसाची पण प्रतीक्षा करावी लागणार नाही…. चक्रीवादळामुळे देखील पाऊस हुलकावणी देणार नाही….. सरासरीपेक्षा जास्त नाही पडला तरी पाऊस येणार हे नक्की…..उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटवून तो विज्ञानवादी शांत झाला. त्यानंतर टीव्हीवर इस्त्रायल-पॅलेस्टिनी युद्ध आणि जगभरातील कोरोनाच्या बातम्यांचा कडकडाट सुरू झाला….. दिवसभर आग ओकून थकलेला सूर्यही आता अस्ताला चालला होता….!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

8 Replies to “मृत्यू बघून डोळ्यातील पाणी आटलंय… आता धुवांधार पाऊस हवा…!”

  1. Gelya varshi ani adlya varshi mi pani foundation che karya follow kelet. Lokanni ektra yevoon pani sathi chi dhadpad vakharnya jogi aahe. Pani aahe tar sarv aahe, hech khare. Shevti samanya mansech ek mekachya madateela yetat. jana samuday la changle valan lavne he mahatvache.

    Liked by 1 person

  2. सध्या सगळं वेगानं घडतंय, माणसाला यातलं काय सापडेल व तो काय गमावेल हे सांगता
    येणं अवघड आहे.
    शॉर्ट फिचर ब्लॉग आवडला. आपले चौफेर निरिक्षण प्रशंसनीय

    Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.