आमरसाचा मोसम सुरू झालाय….येताय ना आंबा चाखायला…?

एप्रिल ते जून महिन्या अखेरपर्यंत आंब्याचा (मँगो) सिझन असतो. विशेषतः महाराष्ट्रात घरा-घरात याकाळात आमरसाची मेजवानी झोडण्यासाठी पाहुण्यांची वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या फैलावामुळे पाहुण्यांची वर्दळ नसली तरी कुटुंबासह आमरसाची लज्जत चाखण्यासाठी खवैय्ये सरसावले आहेत. सध्याच्या काळात एकमेकांच्या घरी येणे-जाणे बंद असले तरी व्हॉट्सअप-फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून घरी बनवलेल्या आमरसाचे फोटो टाकून एकमेकांना आग्रहाची आमंत्रणे दिली जात आहेत.

फळांचा राजा आंबा हे तर भारतीयांचे राष्ट्रीय फळ आहे. याबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपाईन्स या देशातून देखील आंबा मोठ्याप्रमाणात पिकतो. तसं बघायला गेलं तर आंब्याच्या जवळपास तेराशे जाती आहेत. पण आपल्याला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस जातीच माहिती असतात. त्यातही हापूस, पायरी, बदाम, तोतापुरी, नीलम, लंगडा, मलगोवा, केशर या जातीचे आंबे बाजारात विक्रीला आलेले दिसतात. कोकणात तर आंब्याचा सिझन म्हणजे अर्थकारणाला उभारी देणारा फळविक्रीचा हंगाम असतो. कोकणी माणूस भलेही वर्षभर आर्थिक तंगीमुळे पाय दुमडून घरातच बसेल. पण गणपती उत्सव आणि आंब्याचा सिझन आला की त्याच्या उत्साहाला उधाण येते.

आंबा म्हंटल की ‘हापूस’ एव्हढंच आपल्या डोक्यात येतं. हा मार्केटिंगचा प्रपोगंडा म्हणा हवं तर… ‘एक्स्पोर्ट’ होणारा म्हणून बाजारात बोलबाला झाल्यानेच ‘हापूस’चा तोरा आहे. पण गावाकडं शेताच्या बांधावर पिकणारा गावठी ‘गोटी’ आंबा देखील तेव्हढाच रसाळ आणि गोड असतो. अर्थात जेवताना वाट्या-वाट्या आमरस प्यायचा आग्रह झाला तरच कोणत्याही आंब्याचा रस गोड लागतो हे देखील तितकेच खरे आहे. आंब्याच्या सिझनमध्येच शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागत असल्याने मामाच्या गावाला (आजोळी) जायची ओढ खरं म्हणजे मनमुराद आंबा खायला मिळेल या आशेनेच असावी. अलीकडे धकाधकीच्या काळात मामा देखील नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून शहराकडे आलाय, त्यामुळे आत्ताची पिढी आजोळाला जाणे विसरूनच गेली आहे. आतातर काय…कोरोनाचं निमित्त झालंय.

बाजारात आंबा खरेदीला गेल्यावर विक्रेत्याला ‘भैय्या देनेका भाव बोलो’ असं म्हणत भावाची ‘घासाघीस’ करीत आंबे खरेदी केले नाहीत तर आंबा ‘गोड’ निघत नाही अशी अंधश्रद्धा समस्त महिलावर्गात आढळते. याबरोबरच आपल्या नवऱ्याला यातील काहीएक कळत नाही. विक्रेता त्याला फसवून ‘आंबट’ आंबे गळ्यात मारतो यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. हे सांगायचं कारण याच काळात सोसायटीतून, अपार्टमेंटमधून, कॉलनीतून महिला एकमेकींना फोन, व्हॉट्सअपच्या माध्यमातून याच विषयावर हितगुज साधत असतात. आंब्याचं कौतुक नसणारा मराठी माणूस सापडणं केवळ अशक्यच. खाण्यातल्या अनेक पदार्थांबाबत आवड-निवड असू शकते पण आंबा खाणे हा मराठी माणसाचा खाद्यधर्मच आहे. येताय ना मग आंबा खायला…….!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

8 Replies to “आमरसाचा मोसम सुरू झालाय….येताय ना आंबा चाखायला…?”

  1. खाण्यातल्या अनेक पदार्थांबाबत आवड-निवड असू शकते पण आंबा खाणे हा मराठी माणसाचा खाद्यधर्मच आहे.

    खर वाटते तुम्ही. 😃👍

    आपल्याला मराठी येत नाही. माझे शिक्षक मला 5 वर्ष मराठी शिकवले. नंतर । do not have friends to talk in the marathi. कोणतीही नवीन भाषा शिकण्यासाठी आपल्याला time, practice and अनुकूल वातावरण पाहिजे.

    I can understand Marathi but I feel uncomfortable to write it .

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.