
- गेल्या कित्येक वर्षांपासून धकाधकीच्या जीवनात आपण आपले कौटुंबिक सुख हरवून बसलो होतो. लॉक डाऊनमुळे कुटुंबात एकत्रितपणे वेळ घालवण्याची संधी मिळाली.
- बालपणी घरातील वडीलधारी मंडळींकडून झालेल्या संस्काराची पुन्हा उजळणी झाली.
- प्रत्यक्ष भेट होत नसली तरी ख्याली खुशाली विचारण्यासाठी का होईना जिवलग मित्रांशी सुखसंवाद साधला गेला.
- कमाई बंद आणि बाजार बंद अश्या स्थितीत कमीतकमी खर्चात घर चालविण्याचा नवा मंत्र मिळाला. अनावश्यक गोष्टींना आपोआपच कात्री लागल्याने गरजा कमी झाल्या.
- संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची परोपकारी वृत्ती वाढली. आपल्या जवळचे दुसऱ्याला देताना मिळणारा आनंद उपभोगता आला.
- घरातूनच काम (वर्क फ्रॉम होम) सुरू झाल्यानंतर घरकामाचे महत्व अधिक जाणवले. त्यामुळे घरातील महिला सदस्यांचे महत्व पटले. नाती अधिक घट्ट होण्यासाठी लॉक डाऊन कालावधी हा एकप्रकारे उपकारकच ठरला.

जवळपास दहा महिने कोरोनाच्या दडपणाखाली काढल्यानंतर संपूर्ण जग आता पूर्वपदावर येवू लागले आहे. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या कोविड-19 लस देखील आता उपलब्ध झाली आहे. अर्थात तिचे उपयोगीत्व अद्याप सिद्ध व्हायचे आहे, पण ‘बुडत्याला काडीचा आधार’ या म्हणी प्रमाणे दडपणाचे ओझे दूर झाले आहे हे मात्र खरे ! आत्ताशी पहिल्या टप्प्याचे लसीकरण सुरू झाले आहे. सरकार सगळ्यांनाच मोफत लस देवू शकणार नाही, तशी अपेक्षाही कुणी केलेली नाही. मात्र गोरगरिबांना परवडेल अश्या दरात लस उपलब्ध व्हावी एव्हढीच देशवासीयांची माफक अपेक्षा आहे. साधारणतः ऑगस्ट २०२१ मध्ये ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. म्हणजे अजून सहा महिन्यांनी कोरोनाचा साधा ‘मलेरिया’ होईल, या विचाराने सर्वसामान्य लोक आत्तापासूनच निर्भयतेने पुन्हा ठिकठिकाणी गर्दी करू लागलेत. मास्क आता नाका-तोंडावरून घसरून गळ्यात ‘टायचा बो’ बनला आहे. सोशल डिस्टनसिंग म्हणजे अवमान असा समज पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. माणूस पूर्वपदावर येतो म्हणजे पुन्हा हटवादी बनतो, असंच काहीसं म्हणावं लागेल.

संकटकाळात एकमेकांच्या मदतीसाठी सरसावणारे ‘हात’ आता पुन्हा स्वतःपुरते पुढे येताना दिसणार का ? माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा जास्त संवेदनशील आणि सशक्त बुद्धीचा प्राणी समजला जातो. मग महामारीच्या संकटातून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली असतांनाच आपण याकाळात लागलेल्या चांगल्या सवयी भिरकावून देणार आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकानेच आपल्या मनाला एकदा विचारलाच पाहिजे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
लॉक डाऊनच्या काळात घरात बंदिस्त झालो म्हणून का होईना कुटुंबासोबत वेळ देता आला. एकमेकांची नाती अधिक घट्ट झाली. शेजारधर्म कळला. संस्कारांची पुन्हा उजळणी झाली. एक शिस्त पुन्हा अंगी आली. आता हे सगळं विसरायचं का ? पुन्हा जगाशी स्पर्धा करीत वेगाने पळायचं का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
LikeLike