दरवर्षी प्रमाणे ७ फेब्रुवारी पासून व्हॅलेन्टाईन वीक सुरू झालाय. पहिलाच ‘रोझ डे’ असल्याने दिवसभर फुल विक्रेत्याकडे गुलाबाचा भाव वधारलेला दिसला. रोमन परंपरेतील हा प्रेम व्यक्त करणारा उत्सव जेंव्हा ख्रिश्चन धर्मियांनी धार्मिकतेने स्वीकारला त्यानंतरच हा उत्सव जगभर पसरला. भारतात ब्रिटिश राजवटीचा पाया भक्कम होवू लागला त्याच काळात म्हणजेच १८०० सालाच्या प्रारंभीच्या दशकात धर्म प्रसारासाठी भारतात आलेल्या […]
२० फेब्रुवारी १८१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील त्याकाळी माढा तालुक्यात असलेल्या आष्टी (सध्या मोहोळ तालुक्यात) येथे ब्रिटिशांबरोबर झालेल्या युद्धातील पेशवाईच्या दारुण पराभवाची अनेक कारणे आहेत. ज्या दुसऱ्या बाजीरावाला ‘पळपुटा’ हे विशेषण इतिहासाने बहाल केले ते हेच आष्टीचे मराठेशाहीचे शेवटचे निकराचे युद्ध. अंतर्गत कलहाने जर्जर झालेल्या पेशवाईत बंडाळी माजल्यानंतर ठिकठिकाणी होणाऱ्या उठावांना सैनिकी बळ देवून मराठेशाहीचे पतन […]
कुटुंब नियोजनाचे महत्व सांगणारे टायटेक्स या सोलापूरस्थित ६ फूट ६ इंच उंचीचे वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ. जुन्या अडगळीत बंद घड्याळाच्या पार्टसचा वापर करून हे घड्याळ बनवले. कुटुंब नियोजनाचे महत्व सांगणाऱ्या लक्षवेधी हलत्या देखाव्याचा समावेश. घड्याळ दुरुस्तीचे काम करणारे बसवराज विरपाक्षप्पा खंडी हे या घड्याळाचे निर्माते. सध्या त्यांचे वय ८१ वर्षाचे आहे. १९८० मध्ये कार्यान्वित झालेले हे घड्याळ […]
2020 सालाच्या सरतेशेवटी लॉक डाऊनच्या कचाट्यातून सुटका झालेल्या ग्रामीण भागातून कोविड प्रतिबंधक लसीच्या चर्चेचे ‘गुऱ्हाळ’ जसे गावच्या चावडीवर-पारावर सुरू झाले तसे यंदाच्या ऊसाच्या हंगामातील गूळ निर्मितीचे ‘गुऱ्हाळ’ देखील सुरू झाले आहे. सेंद्रिय गूळ आणि काकवी (ऊसाचा उकळता पाक) तयार करण्याकडे गूळ उत्पादकांचा वाढता कल दिसून येत आहे. पूर्वी ग्रामीण भागातून गावोगावी ऊस उत्पादक आपल्या शेतात […]
मनुष्यप्राणी शतायुषी असतो असं म्हणतात. म्हणजेच शंभर वर्षांच्या आयुष्यात आपल्याला कर्तबगारी दाखवायला नेमका किती वेळ मिळतो ? कधी विचार केलाय का ? माझ्या जवळ जरा सुद्धा मोकळा वेळ नाही, असं म्हणत आपण आपल्या जवळ असलेली वेळ चुकवितो की आपण खूप ‘बिझी’ आहोत अशी समजूत करून घेतो ? शंभर वर्षांचे आयुष्य गृहीत धरले तर आयुष्याचे एकूण […]