विज्ञानाबाबत "अगाध" ज्ञान असएका डासाच्या "महानिर्वाणा"ची शोभायात्रा
वि
आहे. याच अगदी कालपरवा मला ज्ञान झाले. परवा कीटक शास्त्राचा अभ्यास असणारा एक पीएचडीचा विद्यार्थी "डास" या किटकसदृश्य प्रजातीवर भरभरून बोलला. माणसाला चावून रक्त शोषणारी "मादी" डास म्हणजेच "डासीन" असते (आपल्या भाषेत) तर "नर" डास हा परागकण शोषतो हा शोध मला माहित झाला. मग मला रात्रभर डास चावले हा वाक्यप्रयोग चुकीचा वाटू लागला. बघा, म्हणजे शोषणाबाबतही योग्य माहिती नसेल तर आपण चुकीच्याच जमातीला शोषणाकर्ता म्हणून जबाबदार धरतो. हे असं आपल्या बाबतीत खूपवेळा होत राहते. बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या समजुतीने "इतिहास" देखील मलिन झाला आहे. तर या मिळालेल्या माहितीनंतर मला "डास" या प्रजातीबद्दल राग येण्या ऐवजी त्यांच्याबद्दल कुतूहल वाढले. त्यांची नारी शक्ती एव्हढी "पॉवरफुल" आहे, जी रोज सर्वशक्तिमान अशा मनुष्यप्राण्याला सळो की पळो करून सोडते. याचंच मला कौतुक वाटू लागलं. आज सकाळी मात्र भिंतीवरून काळ्या मुंग्यांची रांग धीर गंभीर वातावरणात जाताना दिसली. रांगेच्या अगदी मधोमध काही मुंग्यांनी एका मृत डासाचे "शव" आपल्या खांद्यावर घेतलेले दिसले. तो डास की डासीन हे समजू शकले नाही. मात्र ज्या सन्मानाने आणि धीर गंभीर वातावरणात ती अंत्ययात्रा सुरू होती त्यावरून ती मोठ्या शूर योद्धाची अंतिम महानिर्वाण यात्रा असावी असे जाणवत होते. मृत योद्धयाच्या शरीरावर विटंबनेच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. माणसांपेक्षाही कीटकांचे जीवन शास्त्र जास्त सन्मानजनक असावे. मुंग्यांचं समाज शास्त्रच मुळी शिस्तबद्ध असतं. स्वतःहून कुणाच्या वाटी जाणार नाहीत की कुणाची विटंबना करणार नाहीत. मला डासात आणि माणसात एक "साम्य" मात्र आढळले. त्या महानिर्वाण यात्रेकडे एकही डास फिरकला नाही. अगदी माणसा सारखं, मृत व्यक्ती बद्दल चार चांगले शब्द बोलायचे सुद्धा विसरून गेला आहे. सारखं चावून रक्त शोषून डासांना देखील माणसांचा प्रादुर्भाव झाला आहे. रक्तात दोष निर्माण झाला की पुढची पिढी बरबाद होते हा सिध्दांत इथेही लागू होत असावा बहुदा...! अन्यथा एका शूर डासाची अंत्ययात्रा एव्हढी शांत कशी निघाली असती ?
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
मोबा.क्र.:-8806188375

Ati uttam
LikeLike